पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते; गोपीचंद पडळकर
राजकारण

पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते; गोपीचंद पडळकर

मुंबई : खरंतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा उसा उल्लेख करु शकलो असतो पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही.” असे म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात भाजपा आमदार गोपीचंद यांचा फेकुचंद असा उल्लेख केल्यानंतर पडळकर यांनी संजय राऊतांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर आपलं पत्र शेअर केलं आहे. “सामना मी कधी वाचत नाही. सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच,” असं त्यांनी पत्र ट्विट करताना म्हटलं आहे. ”सत्तेच्या धुंदीत लेखणी विरोधकांवर चालते अशी टीका संजय राऊतांनी केली असून मराठा मोर्चांना मूक म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपणास खरंतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा उसा उल्लेख करु शकलो पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही,” असेही त्यांनी म्हंटले आहे.

वाचा, काय लिहिले आहे पत्रात
मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर , खबऱ्या , चमचा असे उद्बोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला आहे. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला.

आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले आहे की महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. ”

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देशमी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी. समाजाच्या सुखदुःखाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दुःखी धनगर समाजाचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन . ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही, ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते मराठा मोर्चाना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार, राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमधे असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरुये याचा अंदाज तरी कसा येणार.

राज्याच्या प्रतिष्ठेवर दारूची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारूची दुकानं उघडून मंदीर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टिका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड़ दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीच प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य; ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत तुम्ही आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का ? शत्रुगटातील स्त्री असली तरी तीची खणानारळाने ओटी भरून यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का तेही महाविकास आघाडीत जाऊन विसरले.

संजय राऊतांनी, आपला पगार किती आणि आपण बोलता किती आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले. ते भाजपच्या आणि विशेषत : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला : पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का : ऊठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्यावे लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळूद्या शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी मी काही विधाने केली तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता ते साहजिकही आहे. कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी असे राहून राहून वाटते .