या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो
राजकारण

या राज्यात कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट मोठं असताना देशातील राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत येत आहेत. त्यात कोरोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. छत्तीसगडमध्ये लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

छत्तीसगडमध्ये लस घेतल्यानंतर देण्यात येण्याऱ्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा फोटो दिसत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लस प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा फोटो आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. मात्र या फोटोला भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांनी विरोध केला आहे. छत्तीसगडने यासाठी स्वत:ची CGTEEKA वेबसाईट पोर्टल तयार केलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविन पोर्टलऐवजी या पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगण्यात आलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या फोटोसह लस प्रमाणपत्र दिलं जात आहे.

छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांनी घेतलेल्या भूमिकेवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनाच्या संकट काळातही काँग्रेस राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी फोटोत गैर काय आहे असं सांगत भाजपवर पलटवार केला आहे. केंद्र सरकार लस देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत आहे. मग छत्तीसगड सरकारने लस विकत घेत मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला त्यात गैर काय आहे, अशा शब्दात आरोग्यमंत्री देव यांनी सुनावलं आहे.