पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; लाज वाटली पाहिजे यांना…
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; लाज वाटली पाहिजे यांना…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ पूजाच्या आत्महत्या केल्याच्या ठिकाणी पोहचल्या. जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी तिने ज्या रूम मधून आत्महत्या केली ती रूम सील करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर चित्रा वाघ थेट वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी संतापाच्या भरात त्यांनी थेट पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इतकचं नव्हे तर त्यांनी पोलिसांवरच निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.

ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? असे अनेक प्रश्न वाघ यानी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना विचारले. “पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असं सांगत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. ते राजकीय दबाबाखाली काम करत आहेत. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेलं नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच, पोलीस रक्षक आहेत की भक्षक आहेत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव असल्याचा आरोपही केला.

त्याचबरोबर “सुओ मोटो अंतर्गत तक्रार का दाखल केली नाही असं मी विचारलं असता लेखी परवानगी नसल्याचं सांगत आहेत. कोणाची चाकरी करत आहात ? आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही असं ते वागत आहेत. नक्की कोणाची परवानगी हवी आहे हे स्पष्ट करावं,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

“मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

“मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या.