पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

मुंबई : बीड जिल्ह्यातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचे नाव घेतले जात होते. मात्र आता चित्रा वाघ यांनी थेट वनमत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवाय सोशल मीडियावर देखील अशीच चर्चा पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर पूजा विशेष लोकप्रिय होती, परिणामी या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटत आहेत. याप्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शुक्रवारी वर्षा निवास्थानी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे. तर सदर प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर देखील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्यात राहणाऱ्या या परळीतील तरुणीने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मंत्र्याकडे बोट दाखवण्यात येत आहे.