जातिवाचक घोषणाबाजीप्रकरणी भाजप नेत्यांसह सहा जणांना अटक
राजकारण

जातिवाचक घोषणाबाजीप्रकरणी भाजप नेत्यांसह सहा जणांना अटक

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान केलेल्या घोषणाबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अश्विनी उपाध्याय व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, ज्यांच्या बॅनरखाली ८ ऑगस्ट रोजी जंतर-मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणात घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजूनही शोध घेत आहेत.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान लोकांनी जातीय घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला. भारत जोडो आंदोलनाच्या वतीने जंतर -मंतरवर निदर्शने करण्यात आली होती.