महाविकास आघाडी सरकारमध्ये घटले गुन्हागारीचे प्रमाण : गोपाळदादा तिवारी
राजकारण

महाविकास आघाडी सरकारमध्ये घटले गुन्हागारीचे प्रमाण : गोपाळदादा तिवारी

पुणे : भाजप सरकारच्या तुलनेने महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण घटले असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/GopalTiwarie/status/1369609358556884996

‘तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री हे नागपूरचे असतांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस लोया यांचा नागपूरमध्येच संशयास्पद मृत्यू होतो. कॉ. गोविंद पानसरे यांचा खून, कोपर्डी येथील दुर्दैवी घटना, भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, व नागपूर मधील वाढती गुन्हेगारी हे सर्व फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत घडले व राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक झाले याचे विस्मरण देखील तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना झाले काय..? असा सवाल गोपाळदादा तिवारी यांनी पुढे केला आहे.

राज्यात बालके व महीलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाले आहे ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही. राज्यातील गुन्हेगारीचा दर कमी झाल्याची नोंद तरी किमान विरोधी पक्ष नेत्यांना असली पाहीजे..! आता कोणाचे तोंड काळे झाले म्हणायचे…(?) असा सवालही तिवारी यांनी विरोधीपक्ष नेते यांना केला आहे. पण आम्ही तसे म्हणणार नाही, कारण आमचे ते संस्कार नाहीत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. राज्यातील गृहखात्याच्या प्रत्यक्ष आकडेवारीवर देखील फडणवीस यांनी अभ्यास करून आत्मचिंतन करून आत्मक्लेश देखील करावा असे आवाहन देखील तिवारी यांनी केले आहे.