आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले
राजकारण

आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले

नवी दिल्ली : ” कॅनडामधील लोकप्रतिनिधींना भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही. टुडो यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे ” अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांना सुनावले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. या आंदोलनाला आता थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी पाठींबा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे म्हटलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना “भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणं चुकीचं ठरेल. भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. तिथे असणाऱ्या शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल आणि ते सहाजिक आहे. असं त्रुडो यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सुनावल्यानंतर शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीदेखील टुडो यांच्यावर निशाणा साधला आहे. ”प्रिय ट्रूडो, मी तुमची काळजी समजू शकते. परंतु आपली राजकीय कारकीर्द चमकवण्यासाठी दुसऱ्या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करणे योग्य नाही. राजकारणासाठी चुकीची वक्तव्ये करू नयेत. त्यामुळे आपण इतर देशांच्या बाबतीत जी परंपरा पाळतो त्याचे अनुसरण करा. तसेच, पंतप्रधान मोदींनाही हा प्रश्न सोडविण्याची मागणी कार्याचे आवाहन करते. अशा शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत टुडो यांच्यावर निशाणा साधला आहे.