प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात
राजकारण

प्रतापराव सरनाईकांनंतर अजून एक शिवसेना नेता ईडी’च्या जाळ्यात

मुंबई : शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्यानंतर आता अजून एका शिवसेना नेत्याला सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकला आहे. सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोपाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची आज हे ईडी’च्या कार्यालयात हजार झाले आहेत. वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनीच आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आनंदराव अडसूळ यांच्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली होती.

तर वडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला होता. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.