बिग ब्रेकिंग ! अनिल परब यांना ईडीची नोटीस
राजकारण

बिग ब्रेकिंग ! अनिल परब यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : ईडीकडून कॅबिनेटमंत्री आणि शिवसेनानेते अनिल परब यांना नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली. मात्र त्याच दिवशी रात्री उशीरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन देखील मंजूर केला.

दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी नेमकं कुणी सांगितलं होतं, याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजापने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलील असतानाच ईडीने कारवाई केली असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे.

चौकशीच्या नोटीसीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र. अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.