काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती देण्यात येत आहे. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल कॉंग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोव्याचं हे दुःख लवकरात लवकर संपवूया. गोव्यात एक नवी पहाट आणूया. मी वयाने म्हातारा असू शकतो, पण माझं रक्त तरुण आहे, असं लुईझिन्हो फालेरो म्हणाले. मी नवेलीम विधानसभेच्या लोकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्या निरंतर समर्थनाची अपेक्षा करतो, असं ट्विट माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो-फालेरो यांनी केलं आहे.

तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवेल!
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी अलीकडेच म्हटलं होतं की, टीएमसी पुढील वर्षी गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही इथे सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या पक्षात हायकमांड संस्कृती नाही. त्या स्थानिक नेत्यांना उभे करतील.