गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी
राजकारण

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेग आला असून विद्यमान २२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे आयोजित केली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. निमा आचार्य यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत कहल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॅबिनेट मंत्री
राजेंद्र त्रिवेदी
जितेंद्र वघानी
ऋषिकेश पटेल
गणेश पटेल
प्रदीप परमार
पूर्णश कुमार मोदी
राघव पटेल
उदय सिंह चव्हाण
मोहनलाल देसाई
किरीट राणा

राज्यमंत्री

हर्ष सांघवी
जगदीश ईश्वर
राघव मकवाणा
विनोद मरोडिया
देवा भाई मालव
बृजेश मेरजा
जीतू चौधरी
मनीषा वकील
मुकेश पटेल
निमिषा बेन
अरविंद रैयाणी
कुबेर ढिंडोर
कीर्ति वाघेला
गजेंद्र सिंह परमार