मी हे आयुष्यभर विसरणार नाही, शेगावच्या सभेत राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला बोलले
राजकारण

मी हे आयुष्यभर विसरणार नाही, शेगावच्या सभेत राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला बोलले

शेगाव, बुलडाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची आज शेगावमध्ये सभा झाली. या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. राहुल गांधींच्या या सभेला ( Bharat Jodo Yatra ) मोठी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि लोकांनी उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. भारत जोडो यात्रे आम्ही जोडण्याचे काम करतो तर विरोधक तोडण्याचे काम करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवाजी महाराजांनी संपूर्ण जागाला दिशा दाखवली. ही महाराष्ट्राची पुण्यभूमी आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आवाज होते. आणि शिवाजी महाराजांना राजमाता जीजाऊंनी दिशा दाखवली. आपण त्यांचे हे मोलाचे कार्य कधीच विसरू शकत नाही. जे शिवाजी महाराजांनी आणि महापुरुषांनी म्हटले, तेच काम ही भारत जोडो यात्रा करत आहेत. हे तुम्ही पूर्णपणे जाणून आहात. कारण या यात्रेला पूर्णशक्तीनीशी काम केले. भरपूर प्रेम तुम्ही दिले. हे सोपं काम नाहीए. ३ हजार ५०० किमी चालणं हे इतकं सोपं नाहीए. पण ते काम तुम्ही सोपं केलं, असं राहुल गांधी म्हणाले.

सभेत व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांचे चेहरे बघा, माझा चेहरा बघा कुणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसून येत नाही. याचं सर्व श्रेय तुमचं आहे. तुम्ही आम्हाला प्रेम दिलं, आम्हाला मदत केली. एवढचं नव्हे तर या यात्रेत आम्हाला खूप काही शिकवलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, तरुणांनी आणि मातांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे हृदयापासून आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं, शक्ती दिली आणि ज्ञान दिलं, हे मी आयुष्यभर विसरणार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपवलं.