माजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
राजकारण

माजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

पुदुच्चेरी : पदुच्चेरी काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रचार समितीची बैठक होती. या बैठकीत एका नेत्याने डीएमके पक्षाचा झेंडा फडकवल्यानं गोंधळ सुरू झाला. यावेळी पदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री व्ही नारायणसामी देखील उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कार्यालयाच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते. पण आतमध्ये कार्यकर्त्यांमध्येच ही हाणामारी झाली. पदुच्चेरीतील 30 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेस पक्ष 30 पैकी 15 जागा लढवत असून 13 जागा द्रमुक पक्ष लढवत आहे. तर सीपीआय आणि व्हीसीके या मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

यापूर्वी 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 15 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुकने 2 जागी विजय मिळवला होता. भाजपला मागील निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. यंदा मात्र पक्षाने विधानसभा निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. कर्नाटकनंतर अन्य दक्षिण भारतामधील राज्यात भाजपचं सरकार येऊ शकतं असा अंदाज देखील काही निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.