माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार असेल
राजकारण

माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार असेल

रत्नागिरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या निर्णयाच्या विरोधात आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”सुरक्ष्या व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, “राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची बातमी समोर येताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता त्यांचीदेखील सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. त्यामुळे फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली.

तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाव वाय सुरक्षा देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा होती. त्यात कपात करून आता त्यांना वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.