सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र
राजकारण

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना’तील अग्रलेखातील भाषेवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अग्रलेखातील भाषेबद्दल रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून शिवसेनेने सतत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सामना च्या अगेलेखातूनहि अनेकदा भाजपा वर टीका केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर अग्रलेखातून झालेल्या टीकेनंतर ते खुपच नाराज असल्याचे दिसत आहेत. इतकेच नव्हे तर शिवसेना आणि भाजपा मध्ये ईडीच्या नोटीसवरून सध्या कलगीतुरा सुरू आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत भाजपा नेत्यांवर टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिव्सेनेंचे खासदार म्हणूनही भाजपा नेत्यांवर टीकास्त्र साधलं जात आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर आता रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

वाचा, चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना लिहिलेलं पत्र

नमस्कार रश्मी वहिनी!
आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपा महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!

वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल.

@SaamanaOnline मध्ये भाजपाबद्दल वापरण्यात येणारी भाषा याबद्दल आज सामनाच्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील.

आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष