गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले
राजकारण

गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले

मुंबई : ”गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवसा निमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, दुसरीकडे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही जयंतीनिमित्त राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची पेरणी सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील व्हिडीओ शेअर केला आहे. ”गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे. देवेंद्र… जीवनात मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करु नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करुन कोणालाही पुढे जाता येत नाही, मोठं होता येत नाही.पण, सत्तेशी संघर्ष केल्यानंतर आपणास जीवनात मोठं होता येतं. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे.

एकच गोष्ट मुंडेसाहेबांकडे होती, ती म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि हिंमत. याच हिंमतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या तरुणाने न्यूयॉर्कपर्यंत मजल मारली. एका छोट्याशा गावातून निघालेला हा तरुण, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, कुठल्याही पैसा, ताकद आणि संघटनेशिवाय पुढे आला. न्यूयॉर्कच्या युएन जनरल असेम्बलीमध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज गोपीनाथराव प्रत्यक्ष रुपाने नसले तरी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठिशी आहे. कितीही संकटं आली तरी, संकटावर मात करायला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत” असेही फडणवीस यांनी सांगितलं.