नारायण राणे प्रकरणांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

नारायण राणे प्रकरणांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणांव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही, असं म्हणत ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली.