विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही
राजकारण

विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही

नगर: बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे देणाऱे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. 30 डिसेंबरला खडसेंना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी, आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय वडेट्टीवार नगरला आले आहेत. खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजप हा मूळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे. त्यांना अन्य घटकांशी काहीही देणेघेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते.’

याबाबत विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ”आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, आम्ही त्याला समोरे जाऊ. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की येथे कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही. दिवस बदलत राहतात. जे पेराल ते उगवेल. नंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवावे.

‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिला.