इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक; राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा
राजकारण

इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक; राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा

मुंबई : मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका, असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंधन दरवाढीने सामान्य माणूस मेटाकूटीला आला आहे. दिवसेंदिवस इंधन दारात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली आहे. मात्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी केलेली दरवाढ ही अयोग्य आहे. केवळ इंधन दरवाढीने सामान्य माणूस त्रस्त नाही तर वीजेची जास्तीची बिले आणि केलली दरवाढ ही सामान्यांना भविष्य काळात अंधारात लोटणारी ठरली आहे. वीज दरवाढ कमी करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत घुमजाव केले आहे. याकडे मनसेने लक्ष वेधले. याच पार्श्वभूमीवर आज मनसेने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन छेडले.

२०१४ साली केंद्र सरकारला पेट्रोल डिङोलच्या करापोटी ५३ हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. तरी देखील दरवाढ कमी न करता ती सामान्यांच्या माथी मारली जात आहे. तर एकीकडे, पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डीझेल दरवाढीने 90 रुपयांचा आकडा गाठला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घरगूती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधऩाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. दरम्यान, या आंदोलनात, या आंदोलनात मनसेचे प्रकाश भोईर, कौस्तूभ देसाई, इरफान शेख, अशोक मांडले, उल्हास भोईर, उर्मिला तांबे, दीपीका पेडणोकर, प्रकाश माने, मंदा पाटील आदी सहभागी झाले होते.