सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदाराला सहा महिन्यांची शिक्षा
बातमी मराठवाडा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदाराला सहा महिन्यांची शिक्षा

औरंगाबाद : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी औरंगाबादचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये २० मे २०१८च्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील खुर्च्या, काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जैस्वाल यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा […]

कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक
क्रीडा

कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक

नवी दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारच्या अटकेनंतर सध्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील माजी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू मनजितला दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. द्वारकाचे डीसीपी संतोषकुमार मीना यांनी सांगितले, की विशेष पथकाने कौशल गँगचा सक्रिय सदस्य मनजित याला २४ मे रोजी […]

रेखा जरे हत्याकांड;  फरार पत्रकार बाळ बोठेला अटक
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड; फरार पत्रकार बाळ बोठेला अटक

अहमदनगरमधील यशस्विनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ […]

सचिन वझेंची बदली नव्हे तर, निलंबन करा; प्रवीण दरेकर विधानसभेत आक्रमक
राजकारण

सचिन वझेंची बदली नव्हे तर, निलंबन करा; प्रवीण दरेकर विधानसभेत आक्रमक

मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहे. सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली […]

अनिल देशमुखांची मोठी घोषणा; सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार
राजकारण

अनिल देशमुखांची मोठी घोषणा; सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस आधिकारी सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार, असल्याची गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र भाजपाने कालपासूनच सचिन […]

डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा
राजकारण

डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से; प्रियांका गांधीचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. दिशा रवीच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेवरून कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला […]

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल
राजकारण

बोल कि लब आज़ाद हैं तेरे; दिशा रवीच्या अटकेवरून राहुल गांधीचा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली : गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंबंधीचं टूलकिट शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २२ वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं रविवारी बंगळुरूतून अटक केली. रवी दिशाच्या या अटकेवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी […]

मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग; अभिनेत्रीला अटक
बातमी मुंबई

मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग; अभिनेत्रीला अटक

मुंबई : मुंबईत वेब सिरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली […]

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक
देश बातमी

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना अटक

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. मनी लाँडरिंग (आर्थिक […]