पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेस जबाबदार : सितारमण

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधनाचे दरात घट होणं कठीण आहे, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्ड्समुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावा लागणार आहे, असं सितारमण यांनी सांगितलं आहे.