इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या
क्रीडा

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या

लॉर्ड्स : लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस असून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल करत भारताला तारले. या दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी उभारली आणि इंग्लंडसमोर २७२ धावांचे खडतर आव्हान ठेवले. फलंदाजी करताना इंग्लंडच्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेज केले. मार्क वूड, जोस बटलर, कर्णधार जो रूट यांनीही बुमराहवर तोंडसुख घेतले. त्यानंतर पंचांनी यात हस्तक्षेप केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/tyrion_jon/status/1427226814695440384

कर्णधार विराट कोहली मैदानावर जे काही घडत होते ते पाहत होता. बुमराहने वुडच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला, तेव्हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बाल्कनीत उभा असलेला विराट कोहली खूप आक्रमक झाला. त्याने रागात टाळ्या वाजवल्या आणि तो शिवीगाळ करतानाही दिसला. विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनला बाद करण्यासाठी सातत्याने बाऊन्सर्सचा बडगा उगारला. काही चेंडू अँडरसनच्या शरीरावरही आदळले आणि शेवटी अँडरसन बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतताना भारतीय खेळाडूंबद्दल त्याने भाष्य केले. चौथ्या दिवशीही अँडरसन आणि विराट यांचा वाद चिघळला आणि हाच कल पाचव्या दिवशीही पाहायला मिळाला.