मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला धमकीवजा इशारा; म्हणाल्या…
राजकारण

मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला धमकीवजा इशारा; म्हणाल्या…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाला देत मोदी सरकारला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. शेजारील देशात पाहा कशाप्रकारे शक्तीशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुफ्ती म्हणाल्या, मी वारंवार सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका? सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावं लागलं. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकारे वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटलं आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचं चित्र तुम्ही खराब केलं आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल.

असं वाटत असेल की आम्ही फार छोटे आहोत, ही काय बडबडते आहे? ही काय करू शकणार? मात्र कधी कधी एखादी मुंगी जेव्हा हत्तीचा सोंडेत शिरते तेव्ही ती त्याचं जगणं कठीण करते, असं देखील यावेळी मुफ्ती यांनी बोलून दाखवलं आहे.