पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट
राजकारण

पंतप्रधान नरेंद्री मोदी अन् ममता बॅनर्जी यांची भेट

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज (ता. २७) ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली होती. आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती. हा आमचा सौजन्य दौरा होता. लोकसंख्येनुसार आम्हाल कमी लसी मिळाल्या आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी यावर लक्ष घालू असं उत्तर दिलं आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या नावाचा प्रश्नही उचलून धरला. तसेच पेगॅसस प्रकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहीजे, असं मतही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपात चुरस पाहायला मिळाली होती. मात्र ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. ममता बॅनर्जी उद्या दिल्लीत पक्ष खासदारांशी चर्चा करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही एबार शपथ, चलो दिल्ली याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.