अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन
राजकारण

अन् पंकजा मुंडेंना आला थेट अमित शहांचा फोन

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान 26 जुलै रोजी सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट पंकजा मुंडे यांना फोन केला असल्याने आनंदी झाल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंकजा यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस होता. यासाठी अमित शहा यांनी पंकजा मुंडे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे की, आभार !!! दिवसाची सुरुवात अमित भाईंच्या फोनने तर दिवसभर अनेक नेत्यांच्या, केंद्रीय व राज्यातील मंत्री आणि सहकाऱ्यांच्या दोन्ही छत्रपतींच्या, राज्यपालांच्या आणि तुमच्या सर्वांच्या मोलाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या निमित्त इतके प्रेम आणि आशीर्वादाने माझी ऊर्जा द्विगुणित झाली.. मी ऋणी आहे.