राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये : काँग्रेस
राजकारण

राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये : काँग्रेस

पुणे : विविध पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे मदत व पुनर्वसन कार्यात व्यत्यय येतो, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, त्यामुळे शक्यतो जास्तीचे दौरे टाळावेत व अपेक्षित मदत कार्याची माहिती संबंधित मंत्रालय वा प्रशासन प्रमुखांकडून घ्यावी अशी स्तुत्य सुचना जेष्ठनेते शरद पवार यांनी आज केली होती. त्यावर तातडीने माजी मुख्यमंत्री व भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांच्या दौऱ्यांमुळेच शासकीय यंत्रणा जाग्या होतात, असे संबोधून राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच एकप्रकारे अविश्वास दाखवला आहे, हे राज्याचे प्रमुख राहिलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या सत्ता काळात जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांनी दौरे केले तेव्हाच प्रशासन हलले काय..(?) हाच अनूभव आपल्याला आला आहे का? विशेष करून ज्या राज्य-प्रशासनाने फडणवीसांना देखील साथ दिली होती. याचे भान तरी किमान फडणवीसांनी ठेवले पाहीजे होते, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एकीकडे फडणवीसांच्या काळात दोन दिवस पाण्यात असलेल्या पुरग्रस्तांनाच मदत देण्याचे निष्कर्ष व धोरण राबवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मात्र आता महाविकास आघाडीने कोणतेही निष्कर्ष न लावता पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी, असा सल्ला देणे मात्र सुचते असल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे.

तसेच, त्यांच्या काळातील पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी केंद्रा कडून ६ हजार २०० कोटींचे अर्थ सहाय्य मागवून केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या फडणवीसांचे सरकार देखील जनतेला अद्याप आठवत आहे, असे वक्तव्य तिवारी यांनी फडणवीसांना संबोधून प्रकाशित केलेल्या निवेदनात केले आहे. महाराष्टाची परंपरा, जनतेप्रती कर्तव्य व संस्कृतीचे संकेत राज्यातील प्रशासन चोख पाळत असल्याचा खरेतर सर्व पक्षीयांनाच अभिमान हवा..! असेही गोपाळदादा तिवारी यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.