पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसे म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसे म्हणाले…

मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करावा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? याबाबतही स्पष्ट विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात.”

“त्यामुळे स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपाचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नाही” असं स्पष्ट विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.