सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज
क्रीडा

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज

मुंबई : महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा आयपीएल २०२१च्या लिलावात समावेश करण्यात आला आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही २७ खेळाडूंची यात नोंद आहे.

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीसंथ यांच्यासह १०९७ क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इनग्राम यांचा दोन कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह समावेश करण्यात आला आहे.