बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ
क्रीडा

बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ

चेन्नई : भारतीय तेज गोलंदाज जसप्रित बुमराह सध्या टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर असलेल्या अनिल कुंबळेची अॅक्शन करत नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याचा कुंबळेच्या अॅक्शने गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. कुंबळेच्या निवृत्तीनंतर त्याचासारखा लेग स्पिनर भारताला अजूनपर्यंत मिळालेला नाही. पण बुमराहने मात्र कुंबळेची नक्कल केली आहे. या व्हिडिओमध्ये बुमराह कुंबळेसारख्या ऍक्शनने बॉलिंग करत आहे. या ऍक्शनने बॉलिंग करूनही बुमराहची लाईन आणि लेन्थही कुंबळेसारखीच अचूक आहे. आपण जसप्रीत बुमराहचे भंभेरी उडवणारे यॉर्कर आणि जलद बाऊन्सर बघितले आहेत. आता त्याची ही अनोखी ऍक्शन पाहा. तो महान बॉलर कुंबळेची नक्कल करत आहे, असं कॅप्शन बीसीसीआयने या व्हिडिओला दिलं आहे.

अनिल कुंबळेने टेस्ट क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. आता कुंबळेप्रमाणेच बुमराही टीम इंडियासाठी मॅच विनर सिद्ध होत आहे. बुमराहने टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने 17 टेस्टमध्ये 79 विकेट, 67 वनडेमध्ये 108 विकेट आणि 50 टी-20 मॅचमध्ये 59 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या सगळ्या 17 टेस्ट परदेशातल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच तो भारतात टेस्ट मॅच खेळणार आहे.