ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची मेजवाणी; भारतीय संघही खेळणार

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये आता चौकार आणि षटकारांची मेजवाणी पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०२८ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे. क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु होते. मात्र बीसीसीआय यासाठी तयार होत नव्हतं. अखेर शुक्रवारच्या बैठकीत ऑलिम्पिकसाठी बीसीसीआयनं हिरवा कंदील दाखवला आहे.

बीसीसीआनं यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. बीसीसीआयनं स्वायत्तता कायम राहावी यासाठी लिखित हमी मागितली आहे. कारण, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय खेळ संघाच्या अंतर्गत येतात. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अंतर्गत काम चालतं. त्यामुळे स्वायत्त असलेल्या बीसीआयनं भारतीय ऑलिम्पिक संघांच्या अंतर्गत काम करण्यास विरोध दर्शवला आहे.