विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर
क्रीडा

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर

लीड्स : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीतील सामन्यात एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून ६९ नंबरच्या जर्सीसहीत फलंदाजीला आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या चाहत्याने अशाप्रकारे पहिल्यांदाच मैदानामध्ये घुसखोरी केलेली नाही. तर त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यानही मैदानात अशीच घुसखोरी केलेली. या चाहत्याचं नाव जारवो असं आहे. लॉर्ड्सवरील घुसखोरीनंतर जारवोवर मैदान प्रशासनाने प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. आता हाच जारवो पुन्हा चर्चेत आला आहे. मागच्या वेळेस क्षेत्ररक्षणाचा हट्ट करणारा जारवो यावेळी फलंदाजीसाठी आला होता.

रोहित बाद झाल्यानंतर विराटऐवजी इतर कोणीतरी मैदानात शिरल्याचं समजल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मैदानामध्ये धाव घेतली आणि त्याला पकडून बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.