लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान
क्रीडा

लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान

टोकियो : भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव झाला. उपांत्य फेरीत लवलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लव्हलिनाने चांगली लढत दिली. लव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत. लव्हलिनाचा उपांत्य फेरीत विश्वविजेत्या टर्कीच्या बुसेनाझ सुर्मीनेलीने ०-५ ने पराभव केला. या पराभवामुळे लव्हलिनाचा टोकियो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला.