दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा
क्रीडा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा

नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची लाट आता ऑस्ट्रेलियातही पोहचली आहे. भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना सुरु असताना या आंदोलनाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना शेकडो लोक हातात फलक घेऊन थांबल्याचे पाहायला मिळाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंट बाहेर कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेक भारतीयांनी पोस्टरबाजी केली. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी आंदोलनाचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये शेकडो शेतकी आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. अनेकांच्या हातात दिल्लीतील शेतकरी आंदोलना पाठिबा दिल्याचे पोस्टर्स दिसत होते.

मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बुमराह, सिराज आणि अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर पहिल्या दिवसअखेर भारतीय फलंदाजीला सुरवात झाली असून भारतालाही पहिला झटका बसला आहे. मयंक अगरवाल शून्यावर माघारी परतला असून दिवसअखेर भारताने १ बाद ३६ पर्यंत मजल मारली आहे.