असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ

चेन्नई : आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लिलावातून चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईने आतापर्यंतच्या 13 मोसमात एकूण 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नईने सर्वाधिक 9 कोटी 25 लाख कृष्णप्पा गौतम या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर खर्च केले आहेत. कृष्णप्पा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. गौतम गत मोसमात पंजाब संघात होता. तसेच सीएसकेने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला 7 कोटी मोजून आपल्याकडे घेतलं आहे. मोईन 13 व्या मोसमात बंगळुरुकडून खेळत होता. तर उर्वरित 4 खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं आहे. यामध्ये टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. पुजाराला 50 लाख मोजून ताफ्यात घेतलं आहे. तर हरीशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत या तिकडीला 20 लाख देऊन चेन्नईने आपल्या गोटात घेतलं आहे.

असा असेल चेन्नईचा संघ
महेंद्रसिंह धोनी, इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा आणि रॉबिन उथप्‍पा.

लिलावात चेन्नईने खरेदी केलेले 6 खेळाडू
के गौतम- 9.25 कोटी रुपये
मोईन अली- 7 कोटी रुपये
चेतेश्वर पुजारा- 50 लाख रुपये
हरिशंकर रेड्डी- 20 लाख रुपये
के भगत वर्मा- 20 लाख रुपये
सी हरि निशांत- 20 लाख रुपये