भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेत २-१ नं आघाडी
क्रीडा

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; मालिकेत २-१ नं आघाडी

अहमदाबाद : अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या फलंदाजीचं मिळालेल्या बळाच्या जोरावर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा दहा विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१नं आघाडी घेतली. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलनं ११, अश्विनने ७ आणि वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. भारतीय फिरकीपटूनं तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या १९ गड्यांना बाद केलं. रोहित शर्मानं पहिल्या डावांत महत्वाची ६६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांतही महत्वाच्या २५ धावा जोडल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडच्या संघानं विजयासाठी दिलेलं अवघ्या ४९ धावांचं आव्हान भारतानं एकही गडी न गमावता पार केलं. दुसऱ्या डावांत रोहित शर्मानं २५ धावांची खेळी केली. तर गिल यानं १५ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडण्यात यश आलं नाही. रोहित शर्मा आणि गिल यांनी बिनबाद ४९ धावांची भागिदारी केली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड
पहिला डाव – ४८.४ षटकांत सर्वबाद ११२ (झॅक क्रॉवली ५३, जो रुट १७, अक्षर पटेल ६/३८, अश्विन ३/२६)
दुसरा डाव – ३०.४ षटकांत सर्वबाद ८१ (बेन स्टोक्स २५, अक्षर पटेल ५/३२, अश्विन ४/४८)

भारत
पहिला डाव – ५२.२ षटकांत सर्वबाद १४५ (रोहित शर्मा ६६, विराट कोहली २७, जो रुट ५/८, जॅक लीच ४/५४)
दुसरा डाव – ७.४ षटकांत बिनबाद ४९ (रोहित शर्मा २५*)