बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का
क्रीडा

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीसनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टिम पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीनं (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आर्थिक दंड ठोठावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या कसोटी सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला ४० टक्के सामना शुल्काचा दंड ठोठावला आहे. सामनाधिकारी डेविड बून यांनी षटकांची गती कमी राखल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघावर ही कारवाई केली. आयसीसी नियम 2.22 नुसार सामनाधिकारी डेविड बून यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर ही कारवाई केली आहे. निर्धारित वेळेत ऑस्ट्रेलियाच्या संघानं दोन षटकं कमी टाकली. हा गुन्हा कर्णधार टीम पेन यानं स्विकारल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येक खेळाडूला प्रति षटक २० टक्केंचा दंड ठोठावला आहे.

नियम 16.11.2 नुसार विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला प्रति षटक दोन गुणांचं नुकसान झालं आहे. पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे गुणही कमी झाले आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल असला तरीही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतर कमी आहे. दरम्यान, भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.