ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप
क्रीडा

ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घरसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे.

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल दोन संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सामना होणार आहेत. चेन्नई कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ट्विट करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची काही समीकरणं सांगितली आहेत. आयसीसीनं सांगितलेल्या समीकरणानुसार भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ अद्याप कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळू शकतात.