प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली
क्रीडा

प्रितीच्या संघाने शाहरुख खानला केले खरेदी; लावली ५ कोटी २५ लाखांची बोली

चेन्नई : प्रिती झिंटा हिच्या पंजाब संघानं आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याला खरेदी केलं आहे. देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूच्या अष्टपैलू शाहरुख खानला प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या युवा अष्टपैलू शाहरुख खान याला पंजाब संघानं पाच कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तामिळनाडूचा युवा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानला आपल्या संघात घेण्यासाठी संघमालकांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघानं शाहरुख खानसाठी मोठी बोली लावली. मात्र, प्रितीच्या पंजाब संघानं ही बोली जिंकली. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत तामिळनाडूचा Uncapped शाहरुख खानच्या कामगिरीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. पंजाब संघात के. एल राहुल, ख्रिस गेल आणि मयांक अगरवाल यांच्यासारख्या दिग्गजांसोबत शाहरुख आता आपलं नशीब अजमाणार आहे.

शाहरुख खानने देशांतर्गत टी-२० सामन्यात दमदार प्रदर्शन करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुख खान यानं ३१ टी २० सामन्यात १३२ च्या स्ट्राईक रेटनं २९३ धावा चोपल्या आहेत. आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.