इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा मोठा विक्रम
क्रीडा

इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा मोठा विक्रम

चेन्नई : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी विजय मिळवला. धावांच्या फरकाचा विचार करता हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी १९८६ साली लीड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडला २७९ धावांनी हरवलं होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला. या विजयासोबतच टीम इंडियाने हा विक्रम केला.

https://twitter.com/kohlifitoor/status/1361578711686868992

पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळून १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांवर आटोपला.