करुन दाखवलं ! भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा विक्रम
क्रीडा

करुन दाखवलं ! भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा विक्रम

सिडनी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये दुसरा टी-२० सामना झाला. यात भारताने दोन चेंडू आणि सहा गडी राखून शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयानंतर भारताने पाकिस्तानचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने पाकिस्तानचा सलग विजयाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला सामना जिंकत पाकस्तान संघाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकत हा कारनामा केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिडनी येथील दुसरा टी-२० सामन्यात भारतीय संघानं जिंकून लागोपाठ १० आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. जुलै २०१८ मध्ये पाकिस्ताननं तिरंगी मालिकेत आधी झिम्बाब्वेला आणि मग ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केलं होतं. यानंतर युएईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला तीन-तीन वेळा पराभव स्विकारावा लागला होता.

कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं पाकिस्तानच्या या विक्रमाशी बरोबरी केली. आता दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. टी-२० मध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आफगाणिस्तान संघाच्या नावावर आहे. आफगाणिस्ताननं २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकले होते. २०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते.