Good News! विराटच्या आधी ‘या’ गोलंदाजाने मारली बाजी; कन्यारत्न प्राप्ती
क्रीडा

Good News! विराटच्या आधी ‘या’ गोलंदाजाने मारली बाजी; कन्यारत्न प्राप्ती

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला आहे. मात्र, विराटच्या आधी जलदगकी गोलंदाज उमेश यादवने बाजी मारली आहे. उमेश यादवला कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती त्याने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली. मुलगी झाली, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे, असा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे.

उमेश यादवचा १६ एप्रिल २०१३ला दिल्लीची फॅशन डिझायनर तानया वाधवा हिच्याशी साखरपुडा झाला. त्यानंतर २९ मे २०१३ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. उमेशची पत्नी तानिया त्याच्यासोबत आयपीएल २०२०मध्ये दिसून आली. सुरूवातीच्या काळात उमेश यादव झारखंडमध्ये वास्तव्यास होता. पण, काही कौटुंबिक समस्यांमुळे तो नागपुरात स्थायिक झाला. लग्नानंतर सात वर्षांनी उमेश-तानया पहिल्यांदा आई-बाबा झाले.