खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्मय घेतला असून याबाबतचे अधिकृत वृत्त पीटीआयने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ही लस सर्वात आधी कोणाला देण्यात येणार आहेत. त्याच्या यापूर्वीच सरकारकडून सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.