भारत पराभवाच्या छायेत; अर्धा संघ तंबूत
क्रीडा

भारत पराभवाच्या छायेत; अर्धा संघ तंबूत

चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत असून भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे महाकाय आव्हान दिले. मात्र भारताचे महत्वाचे ५ फलंदाज तंबूत परतले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. पुजारा बाद झाल्यानंतर विराट मैदानात आला. सलामीवीर शुबमन गिलने फटकेबाजीला सुरूवात करत अर्धशतक ठोकलं. पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच तो माघारी परतला. ८३ चेंडूत ५० धावा करणाऱ्या गिलला अँडरसनने माघारी धाडले. त्यानंतर जेम्स अँडरसनच्या इनस्विंग गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे केवळ तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याला धावांचे खातेही उघडता आले नाही. पहिल्या डावातदेखी रहाणेला केवळ एकच धाव करता आली होती. त्यापाठोपाठ पहिल्या डावात मोठी खेळी करणारा ऋषभ पंतही लवकर बाद झाला.

इंग्लंड पहिला डाव– सर्वबाद ५७८ (जो रूट – २१८; बुमराह- ८४/ ३)
भारत पहिला डाव– सर्वबाद ३३७ (ऋषभ पंत – ९१; डॉम बेस- ७६ / ४)
इंग्लंड दुसरा डाव– सर्वबाद १७८ (जो रूट- ४०; अश्विन- ६१ / ६)