WTC : इंग्लंडच्या पराभवानंतर भारत पहिल्या स्थानावर
क्रीडा

WTC : इंग्लंडच्या पराभवानंतर भारत पहिल्या स्थानावर

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दमदार कमबॅक करत उर्वरित तीनही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवल्यानंर भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 70% पॉईंटसह त्यांचे स्थान निश्चित केले होते. या अंतिम टप्प्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला असून अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा हवेतच विरली आणि भारतीय संघानं या मालिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारत आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अहमदाबादमधील शेवटची कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकूण 520 गुण जिंकले आहेत आणि 72.2 टक्के गुण जिंकले आहेत.

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंड संघाला जेरीस आणलं. दुसऱ्या डावात केवळ 135 धावा करण्यात इंग्लंडच्या संघाला यश मिळालं. अक्षर पटेल आणि आर अश्विनचा तुफान गोलंदाजीनं इंग्लंडच्या बड्या फलंदाजांची दांडी गुल झाली आणि भारतीय संघानं मालिका आपल्या खिशात घातली. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-1 ने विजय मिळवला आहे.