Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद
क्रीडा

Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद

रायपूर : रोड सेफटी सिरीजमध्ये भारतीय लिजंड्स संघाला विजेतेपद मिळाले आहे. युसूफ पठाण आणि युवराज सिंगची तडाखेबंद अर्धशतकी खेळी तसेच पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव केला. पठाण बंधूनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युसूफच्या नाबाद ६२ धावा तसेच युवराजच्या ६० धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ४ बाद १८१ धावा उभारल्या. मग इरफान-युसूफ या पठाण बंधूंनी श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. सनथ जयसूर्याने ४३ धावा केल्या. कौशल्य वीररत्ने (३८) व चिंतका जयसिंघे (४०) यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला ७ बाद १६७ धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक
भारत लिजंड्स : २० षटकांत ४ बाद १८१ (युसूफ पठाण नाबाद ६२, युवराज सिंग ६०; रंगना हेराथ १/११) विजयी वि. श्रीलंका लिजंड्स : २० षटकांत ७ बाद १६७ (सनथ जयसूर्या ४३, चिंतका जयसिंघे ४०; युसूफ पठाण २/२६, इरफान पठाण २/२९).