गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव
क्रीडा

गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला असून, भारतीय संघाचं कौतूक करत अभिनंदन केलं आहे. ”पंतप्रधान मोदी म्हणाले,”भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयामुळे आपण खूप खूश आहोत. भारतीय संघाची ऊर्जा आणि विजयाचं वेड दिसून येत होतं. त्याचबरोबर त्यांचा दृढ निर्धार, उल्लेखनीय धाडस आणि दृढ संकल्प होता. संघाचं अभिनंदन. भविष्याती प्रयत्नांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असं म्हणत मोदींनी विजयानंतर आनंद व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे.

शुबमन गिलने मोडला गावसकरांचा ५० वर्षे जुना विक्रम
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शुबमन गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. शतकाने त्याला हुलकावणी दिली पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला आहे.

पंतने मोडला धोनीचा विक्रम
चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एक हजार धावा करताच पंतने भाराताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत सर्वात वेगवान धावा करण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम पंतने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता.