३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक
क्रीडा

३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ वर्षअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि ४ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी भारत दौऱ्याची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ ते २१ डिसेंबर दरम्यान जोहान्सबर्ग येथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान खेळली जाणारी तीन सामन्यांच्या कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही देशांदरम्यान ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. हे सामने केपटाऊन आणि पार्ल सिटीमध्ये खेळले जातील. यानंतर, २३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान दोन्ही देशांदरम्यान चार सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिले दोन सामने न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळले जातील, तर इतर दोन सामने २३ आणि २६ जानेवारी रोजी बोलंड पार्क, पार्ली येथे खेळले जातील. टीम इंडियाने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिली कसोटी – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी कसोटी – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर, सेंच्युरियन
तिसरी कसोटी – ३ जानेवारी ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग

एकदिवसीय मालिका
पहिला सामना – ११ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
दुसरा सामनन – १४ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
तिसरा सामना – १६ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन

टी-२० मालिका
पहिला सामना – १९ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
दुसरा सामना – २१ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
तिसरा सामना – २३ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
चौथा सामना – २६ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी