चहलबाबत विधान करणं युवराजला पडलं महागात; गुन्हा दाखल
क्रीडा

चहलबाबत विधान करणं युवराजला पडलं महागात; गुन्हा दाखल

मुंबई : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहला इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह कार्यक्रमात युजवेंद्र चहलबद्दल केलेलं विधान चांगलंच भोवलं आहे. युवराज सिंहवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयणातील हिसारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असून यामध्ये त्याच्यावर दलित समाजाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युवराज सिंह 1 जून 2020 रोजी एका लाईव्ह कार्यक्रमात रोहित शर्मा सोबत सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यानं युजवेंद्र चहलबद्दल अपनानजक भाषा वापरली होती. युवराजचं ते वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. 2 जून रोजी हरियाणातील हांसी पोलीस स्टेशनमध्ये युवराजच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

एससी/एसटी अ‍ॅक्टमधील संशोधन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकारच्या तक्रारीनंतर खटला दाखल झाल्यानंतर चौकशी करावी लागते. युवराजच्या प्रकरणात पोलिसांनी खटला दाखल न करता प्राथमिक तपास सुरू केला, असा दावा काही दिवसांपूर्वी याचिकाकर्त्यानं केला होता. त्यानंतर आता युवराजवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.