ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेला सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये दिसले. भारतानं पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं ०४ बाद ३०७ धावा केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला असला तरिही भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या सराव सामन्यात साहानं अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सराव सामन्यात पंतने शतकी खेळी केली. साहा आणि पंत यांनी फलंदाजी करत संघातील आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार हा पेच कायम आहे. तसेच मयांकसोबत सलामीला कोण येणार? गिल की पृथ्वी शॉ यांच्यापैकी कोण येणार? हा पेचही कायम आहे.

गोलंदाजीतही तिसरा वेगवान गोलंदाज कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. बुमराह-शामीच्या जोडीला तिसरा वेगवान गोलंदाज कोण असणार? उमेश यादव, सैनी आणि सिराज यांच्यापैकी एकाला स्थान मिळणार आहे. सराव सामना अनिर्णित राहिला असला तरीही १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघात कोणते ११ खेळाडू असणार याबाबत औस्तुक्य कायम आहे.

तीन दिवसांत भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघातील प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंनी शतकी खेळी केली. भारताकडून हनुमा विहारी आणि पंत यांनी शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून बेन मॅकडर्मोट (नाबाद १०७ धावा) आणि जॅक वाइल्डरमुथ (नाबाद १११ धावा) करून परतले. पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या २० विकेट पडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवलं तर तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघानं वर्चस्व गाजवलं.