देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन
राजकारण

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? : कमल हसन

तामिळनाडू : ”देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी विचारला आहे. राजधानी दिल्लीत नवे संसद उभारण्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हसन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कमल हसन म्हणाले की, “अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? करोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावलं आहे. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितलं की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरूवारी दिल्लीमध्ये नवीन संसद भवानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणामध्ये नवीन संसद भवनाचं महत्त्व सांगितलं. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनीदेखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. “सध्या देश आर्थिक मंदीच्या छायेतून जात आहे. भाजप सरकार सवल देण्याऐवजी २० हजार कोटी रूपयांची उधळपट्टी करत आहे. यावरून हे सरकार कोणत्याही संवेदना नसलेलं आहे.” अशी टीका त्यांनी केली होती.

तसेच, सरकारचा हा निर्णय एकाद्याच्या अंतिम संस्कारादरम्यान डीजे वाजवण्यासारखा आहे. एकीकडे कृषी कायद्यांच्या माध्यमातून भाजपनं शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर बलुडोजर चालवला. तर दुसरीकडे ते जनतेचे पैसे संसद भवनाच्या उभारणीवर खर्च करत आहेत. याची कोणतीही आवश्यकता नव्हती. परतु आपल्या अहंकाराला संतुषअट करण्यासाठी त्यांच्याकडून असे प्रकार केले जात आहेत,” असंही ते म्हणाले.